Technology

QR कोड स्कॅन करून दुसऱ्या फोन मध्ये Transfer करा तुमच्या व्हॉट्स ॲप मोबाईल मधील चॅट

आपल्यापैकी अनेक जण व्हाट्सअप हमखास वापरत असतात. खूप कमी लोक असे आहेत की ते व्हाट्सअप वर नाही परंतु व्हाट्सअप ॲप्लिकेशन सध्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग बनलेला आहे. सकाळ झाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण अनेकांना व्हाट्सअप च्या मदतीने मेसेज पाठवत असतो परंतु अनेकदा व्हाट्सअप वापरताना आपल्याला अडचण येत असते, ती म्हणजे जर आपण नवीन मोबाईल विकत घेतला तर आपल्या व्हाट्सअप ऍप्लिकेशन मधील चॅट ट्रान्सफर होत नाही किंवा काही मेसेजेस आपल्या नव्याने मोबाईल मध्ये राहत नाही. त्याचबरोबर व्हाट्सअप वापरताना अनेकदा आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शंका देखील निर्माण होत असतात.

बहुतेक वेळा थर्ड पार्टी एप्लीकेशन व्हाट्सअप चॅट ट्रान्सफरची आपल्याला सुविधा देत असतात परंतु ही सुविधा वापरल्याने आपल्या मोबाईल मधील डेटा लिक तर होणार नाही ना.. याचा धोका देखील निर्माण होतो परंतु आता तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. व्हाट्सअप ॲप्लिकेशन ने नवीन फीचर्स तुमच्यासाठी आणलेले आहे यामुळे व्हाट्सअप मधील चॅट तुम्हाला एका फोन मधून दुसऱ्या फोनमध्ये सहजच ट्रान्सफर करता येणार आहे, त्यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स वापरायचे आहेत आणि काही स्टेप्सचा वापर करायचा आहे.

आपल्या सर्वांना माहितीच आहे की व्हाट्सअप ऍप्लिकेशनचे सीईओ मार्क झुकरबर्ग आहे त्यांनी या बद्दल फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केलेली होती आणि याच पोस्टमध्ये किंवा क्यू आर कोडच्या मदतीने आता सहजच तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप मधील चॅट ट्रान्सफर करता येईल याची माहिती सांगितली होती. या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवणार नाही. ही प्रक्रिया अगदी सुरक्षित आहे,असे देखील त्यांनी म्हटले. तुमच्या मोबाईल मध्ये कितीही आकाराची चॅट असली तरी तुम्हाला आता याच्यापुढे काळजी करण्याची कारण नाही. चॅट मधील मोठ्या मोठ्या फाईल अटॅचमेंट सहज तुम्हाला ट्रान्सफर करता येणार आहे.

असे करण्याचे सोपे असले तरी तुम्हाला काही नियम व अटी पाळणे गरजेचे आहेत,त्यासाठी तुम्हाला व्हाट्सअप ऍप्लिकेशन ची चॅट ट्रान्सफर करण्यासाठी जे दोन डिवाइस असतील ते एकाच ऑपरेटिंग सिस्टमचे असायला हवे, तेव्हाच तुम्हाला व्हाट्सअप ऍप्लिकेशन मध्ये चॅट ट्रान्सफर करता येणार आहे. जर तुमच्याकडे एक मोबाईल अँड्रॉइड व दुसरा आयओएस सिस्टम असेल तर अशावेळी तुम्हाला ही प्रक्रिया करता येणार नाही.

यासंदर्भात मार्क झुकरबर्ग यांनी एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला होता या मीडियाच्या माध्यमातून देखील आपल्याला आवश्यक ती माहिती प्राप्त होते.

सध्या तरी आपल्याला एखाद्या चॅटचे बॅकअप करायचे असेल तर आपण क्लाऊड चा वापर करतो परंतु क्यूआर कोड स्कॅन करणाऱ्या प्रोसेस मध्ये डेटा क्लाऊड वर बॅकअप होणार नाही म्हणूनच तुम्हाला व्हाट्सअप भेटायचे बॅकअप करण्याची गरज देखील आता भविष्यात पडणार नाही. या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून चॅट लगेच ट्रान्सफर करू शकता. हे करण्यासाठी तुम्हाला लोकल वायफाय नेटवर्क देखील वापरावे लागणार आहे. जर तुम्हाला किंवा क्यू आर कोड च्या माध्यमातून चार ट्रान्सफर करायची असेल तर त्या करता तुम्हाला व्हाट्सअप सेटिंग मध्ये जावे लागेल आणि त्यानंतर चॅट ट्रान्सफर या पर्याय वर क्लिक करून जो क्यूआर कोड येईल त्याला स्कॅन करावा लागेल, अशा प्रकारे सहज सोप्या स्टेप चा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईल मधील चॅट दुसरे डिवाइस मध्ये घेऊ शकता.