Technology

व्हाट्सएप वर आता एकाच वेळी 32 लोकांशी करू शकता व्हिडिओ कॉल !

तंत्रज्ञानाचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. पूर्वीच्या काळी एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी वाट पाहावी लागायची त्याकरिता वेळ देखील मोठ्या प्रमाणावर लागायचा. तुम्हाला तार,पत्र या गोष्टी माहितीच असतील. एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधायचा असल्यास आपल्याला तार किंवा पत्र द्यावे लागायचे परंतु तंत्रज्ञान आणि काळाची प्रगती झाल्याने सगळे स्वरूप बदलले. माणसाच्या हातामध्ये टेलिफोन, पेजर, मोबाईल फोन इत्यादी साधने उपलब्ध होऊ लागली. या सर्व साधनांच्या मदतीने मनुष्य संवाद मोठ्या प्रमाणात साधू लागला. एकमेकांशी जास्तीत जास्त जोडला जाऊ लागला.

आपल्या सर्वांना व्हाट्सअप माहिती आहे. या व्हाट्सअप च्या मदतीने आपण एकमेकांशी दररोज संवाद साधत असतो. लॉकडाउनच्या काळात सर्वांनी व्हाट्सअप ऍप्लिकेशनच्या मदतीनेच इतरांची विचारपूस केलेली आपल्याला आजही आठवते. व्हाट्सअप च्या मदतीने एकमेकांना मेसेज करणे. एकमेकांना व्हिडिओ कॉल करणे यामुळे आपण लांब असून देखील एकमेकांच्या जवळ आहोत अशी जाणीव अनेकांना झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आज आम्ही तुम्हाला व्हाट्सअप व्हिडिओ कॉल बद्दल काही नवीन अपडेट आलेले आहेत याबद्दल माहिती सांगणार आहोत. हे अपडेट तुम्हाला नवीन फीचर्स ची माहिती देतील, यामुळे व्हाट्सअप वापरण्याकरिता तुम्हाला भविष्यात अधिक सहजता मिळेल. या ॲप्लिकेशनचा वापर तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकता.

व्हाट्सअप आपल्या ग्राहकांसाठी नेहमी काही ना काही नवीन बदल घडवून आणत असतो. ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करणे हे व्हाट्सअप यांचे हेतू असते आणि म्हणूनच यंदा देखील ग्राहकांच्या सेवेमध्ये जास्तीत जास्त बदल करता यावा याकरिता व्हाट्सअप ऍप्लिकेशन ने काही महत्त्वाचे फीचर्स आणलेले आहेत. या फीचर्स मुळे तुम्हाला व्हिडिओ कॉल करणे अत्यंत सोपे होणार आहे.

व्हाट्सअप चे नवीन फीचर्स मुळे तुम्हाला व्हिडिओ कॉल आणि व्हॉइस कॉल करता येणार आहे आणि म्हणूनच या फीचर्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्रमंडळींशी जास्तीत जास्त कनेक्टेड राहू शकता.

या व्हाट्सअप ऍप्लिकेशनच्या नवीन फीचर्सची माहिती स्वतः कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एका फेसबुकच्या मदतीने केली. त्याचबरोबर सध्या कंपनी सुरक्षित अँकर व्हिडिओ कॉलिंग करिता टेस्टिंग देखील करत आहे, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात एकाच व्हिडिओ कॉलवर 32 लोकांशी बोलता येणार आहे. सध्या तरी व्हाट्सअप व्हिडिओ कॉल वर आपण सहा लोकांसोबत गप्पा मारू शकतो. लवकरच नवीन अपडेट फीचर्स मुळे तुम्हाला 32 लोकांसोबत संवाद साधायला मिळणार आहे असे देखील मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले

नवीन फीचर्स चा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचे व्हाट्सअप अपडेट करावे लागणार आहे त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कॉल सेटिंग मध्ये झालेले नवीन बदल वापरता येतील. यानंतर युजरला कॉल च्या ऑप्शन वर जाऊन कॉल लिंक बनवावी लागेल आणि ज्या लोकांशी तुम्हाला बोलायचे आहे अशा लोकांना ही लिंक तुम्ही पाठवू शकता. या लिंकच्या मदतीने तुम्ही तुमचा व्हिडिओ कॉल पूर्ण करू शकता. व्हाट्सअप आपल्या युजरसाठी आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर्स देखील भविष्यात आणणार आहे. या कॉल लिंकच्या माध्यमातूनच तुम्हाला दोन्ही ठिकाणी लिंकच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल करता येऊ शकेल.