Life Technology

अभिनेता आमिर खानने मोबाईल वापरणे बंद का केले ?

मोबाईल हा प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत झालेला आहे असे म्हणायला हरकत नाही. या मोबाईल शिवाय आपण श्वास देखील घेऊ शकत नाही. मोबाईल हेच आपले विश्व झालेले आहे. या मोबाईल मध्ये आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. आभासी जगत जीवन जगत असताना आपण अनेकांना प्रत्यक्ष कमी भेटतो परंतु या मोबाईलच्या माध्यमातूनच सोशल मीडियावर एकमेकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जोडले गेलेले असतो. एक दिवस मोबाईल आपल्या सोबत नसला तर आपल्याला काहीतरी हरवल्यासारखे वाटते, चुकल्यासारखे वाटते परंतु बॉलीवूडमधील एका अभिनेत्याने चक्क काही दिवसांकरिता मोबाईल वापरणे पूर्णपणे बंद करून दिले होते, याबाबतचा किस्सा सांगणारा एक व्हिडिओ हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने असे करण्यामागील नेमके कारण काय याबद्दल आम्ही तुम्हाला आज लेखामध्ये सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.

बॉलीवूड हे असे क्षेत्र आहे जेथे काही ना काही घडत असते. प्रत्येक अभिनेत्याची चर्चा ही वेगवेगळ्या कारणामुळे केली जाते. आज देखील एका अभिनेत्याची चर्चा पुन्हा केली जात आहे. या अभिनेता चे नाव आहे आमिर खान. आमिर खान म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर गजनी, थ्री इडियट्स यासारखे चित्रपट डोळ्यांसमोर येतात आतापर्यंत आमिर खानने ज्या ज्या चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या आहेत, त्या सर्व सुपरहिट झालेल्या आहेत. परफेक्ट अभिनय करणारी व्यक्ती म्हणून आमिर खान कडे पाहिले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट करत असतानाच आमिर खान सामाजिक उपक्रमांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसून येतो. काही महिन्यापूर्वी आमिर खानने पाणी फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या खेड्यांपाड्यांपर्यंत आमिर खान पोहोचला. पाण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागणारी वण कण त्यासाठी करावे लागणारे उपाय नियोजन याबद्दल त्याने सविस्तरपणे सांगितले आहे आणि श्रमदान ही संकल्पना आमिरने आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली.

पाणी फाउंडेशन चे काम करत असताना आमिर खानने सहा आठवडे मोबाईल वापरणे बंद केले होते याबद्दल आमिर खानने स्वतः माध्यमांवर सांगितले. एका वृत्तवाहिनीवर घेण्यात आलेल्या इंटरव्यू मध्ये आमिर खानने याबद्दल कारण सांगितले होते. आमिर खान गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल फोन स्मार्टफोन यांच्या सवयीमुळे त्रस्त झाला होता. मोबाईल फोन मुळे एडिक्ट झाला होता. आमिर खानला मोबाईल वापरण्याची सवय झाली होती त्याच्या मोबाईल मध्ये दहा ते पंधरा फॅमिली व्हाट्सअप चे ग्रुप होते. कामाच्या निमित्ताने वाढत असलेल्या उपयोग तसेच आमिर खानला चेस खेळण्याची आवड आहे यामुळे तो ऑनलाइन गेम जास्त खेळायचा. ऑनलाइन गेम खेळत असताना जास्तीत जास्त वेळ मोबाईल फोनवर जायचा. या सर्वांमुळे त्याच्यावर मानसिक परिणाम देखील होऊ लागला होता. कालांतराने आमिर खान ला जाणवू लागले की आपल्याला मोबाईल फोनची सवय लागत आहे आणि ही सवय भविष्याकरिता अत्यंत हानिकारक ठरू शकते.

मोबाईल फोन बंद केल्यामुळे आमिर खानच्या जीवनामध्ये अनेक असे काही बदल झाले त्याचे वर्णन शब्दांमध्ये करणे कठीण आहे, असे स्वतः आमिर खानने सांगितले. मोबाईल बंद केल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये झालेले सारे बदल अमुलाग्र होते. मोबाईल आपल्या आजूबाजूला नसल्यामुळे आमिर खान स्वतःबद्दल विचार करू लागला. आपले आई वडील, पत्नी मुलांच्या भविष्याबद्दल विचार करू लागला. गाडीमध्ये एकटे असताना चित्रपटांबद्दल तसेच त्यांच्या भूमिकांचा अभ्यास यासाठी लागणारे संशोधन तो करू लागला. मोबाईल न वापरल्यामुळेच पाणी फाउंडेशन साठी तो जास्तीत जास्त प्रयत्न करू लागला असे देखील आमिर खानने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. जर माझ्या हातामध्ये मोबाईल फोन असता तर मी पाणी फाउंडेशनचे इतके मोठ्या प्रमाणावर काम करू शकलो नसतो अशी कबूली देखील आमिर खानने या व्हिडिओमध्ये दिली आहे.

जर तुम्ही देखील मोबाईल फोनचे मोठ्या प्रमाणावर व्यसन लागले असेल तर योग्य वेळीच ते सोडा नाहीतर तुमचे खूप नुकसान होऊ शकते, असा सल्ला देखील आमिर खानने यावेळी लोकांना दिला. भविष्यात पुढे जायचे असेल तर मोबाईल फोन फक्त काही काळाकरिता बंद करावा तसेच कमी वेळे करिता त्याचा वापर करावा यामुळे तुमचा उत्कर्ष सहज साधला जाऊ शकतो असे देखील आमिरने सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत