Investment

25 हजार रुपये कर्ज घेऊन सुरू केलेला व्यवसाय झाला 7500 कोटींचा

आपल्या आजूबाजूला अश्या अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी संघर्षा मधून वाट काढून आपले यश साध्य केलेले आहे. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट मनापासून करायची असेल तर ती व्यक्ती कोणत्याही संकटाचा, संघर्षाचा विचार करत नाही. आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी ती व्यक्ती नेहमी प्रयत्नशील असते तसेच आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जे कोणतेही कार्य करत असताना हजार कारणे देत असतात अशा लोकांच्या नशिबी नेहमी अपयश येत असते.

जर तुम्हाला देखील तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तुमचे स्वतःचे असे काही अस्तित्व निर्माण करायचे असेल तर मेहनत करणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशा एका यशस्वी बिझनेस मॅन बद्दल सांगणार आहोत. या व्यक्तीने सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष केलेला आहे. चाळीस वर्षांपूर्वी 25 हजार रुपयांचे कर्ज घेऊन या व्यक्तीने आपला व्यवसाय सुरू केला आणि पाहता पाहता आज या व्यक्तीची कंपनी 7500 कोटी रुपयांचे उत्पन्न घेत आहे. ही व्यक्ती कोण आहे? या व्यक्तीने नेमके असे काय केले याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत त्या व्यक्तीचे नाव आहे ए प्रताप रेड्डी. त्यांचे वय आता 72 वर्ष आहे. रेड्डी यांचे व्यक्तिमत्व इतके प्रसिद्ध आहे की आजच्या घडीला तेलंगणातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जाते. आज जरी खूप प्रसिद्धी मिळत असली तरी एकेकाळी त्यांना खूप मेहनत करावी लागली होती. चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी एक कर्ज घेतले होते, त्या कर्जामुळेच आजचा सुवर्ण दिवस त्यांच्या नशिबी आलेला आहे असे म्हणायला हरकत नाही. चाळीस वर्षांपूर्वी रेड्डी यांनी बँक मधून 25,000 रुपयांचे कर्ज घेतले होते आणि त्यानंतर आपली स्वतःची कंपनी स्थापन केली होती.

ए प्रताप रेड्डी यांच्या कंपनीचे नाव बालाजी एमाइंस आहे. ही कंपनी सध्या 7500 करोड रुपयाचे उत्पन्न घेते. आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये अनेक असे काही संकट आले त्यामुळे अक्षरशः त्यांना जमिनीला हात टेकावे लागले परंतु इतके सारे घडून देखील त्यांनी धीर सोडला नाही. प्रत्येक संकटावर मात करून आज कंपनीचा डोलारा अगदी आनंदाने सांभाळत आहे. आजच्या घडीला रेड्डी सर्वात यशस्वी बिझनेस मॅन म्हणून ओळखले जातात.

रेड्डी यांनी गरीबी जवळून पाहिली होती. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य मध्यम कुटुंबीयात झाला होता. लहानपणापासून गरिबी पाचीला पुजलेली होती. इतके सारे असून देखील त्यांनी स्वतः संघर्ष करून गरिबीतून वाट काढली. रेड्डी यांना नेहमी दहा किलोमीटर पायी चालून शाळेत जावे लागायचे. इतके सारे करताना देखील त्यांनी हार मानली नाही आपले शिक्षण पूर्ण केले आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले.

बिझनेस मॅन रेड्डी यांनी वयाच्या 25 व्या वर्षी बिझनेस सुरू केला होता. रेड्डी यांना आपल्या जीवनामध्ये काहीतरी मोठे करायचे होते याकरिता त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी वयाच्या पंचविसव्या वर्षी एका बँकेकडून कर्ज घेतले. सुरुवातीच्या काळामध्ये छोटे-मोठे व्यवसाय केले त्यानंतर एक केमिकल बिजनेस सुरू करण्याची इच्छा त्यांना झाली. 1988 मध्ये रेड्डी यांनी केमिकल बिजनेस ची सुरुवात केली आणि त्यालाच बालाजी अमाइंस असे नाव दिले.

आजच्या घडीला या कंपनीकडे 12 ब्रांचेस आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये कमी किमतीमध्ये गुंतवणूक करून देखील त्यांनी आजच्या क्षणाला मोठी रक्कम निर्माण केलेली आहे. आजच्या क्षणाला रेड्डी यांना जे यश मिळत आहे त्यामागील त्यांची मेहनत कारणीभूत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत