Technology

इंस्टाग्राम वरून आता Photo / Reels डाउनलोड करता येणार !

मित्रांनो हल्ली सोशल मीडिया कोण वापरत नाही? असा एखादा ठराविक व्यक्ती असेल की जो इंस्टाग्राम, युट्युब फेसबुक यासारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत नसेल. हल्ली प्रत्येकाचा सोशल मीडिया जीव की प्राण झालेला आहे. थोडा वेळ जरी इंटरनेट चालू नसेल व एखादे एप्लीकेशन चालू नसेल तर सगळीकडे हाहाकार माजून जातो. सगळीकडे या संबंधित पोस्ट आपल्याला दिसू लागतात. इतके आपण या सर्व सोशल मीडियाच्या जवळ आलेलो आहोत. सोशल मीडिया वापरत असताना प्रत्येकाला आपण वापरत असलेल्या एप्लीकेशन जास्तीत जास्त वापरणे सोपे व्हावे असे वाटत असते आणि हीच मागणी लक्षात ठेवून एप्लीकेशन बनवणाऱ्या कंपन्या देखील ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर विचार करत असतात. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगले फीचर्स देणे याबद्दल डेव्हलपर विचार करतात.

आज आम्ही तुम्हाला इंस्टाग्राम या सोशल मीडिया नेटवर्क बद्दल सांगणार आहोत. इंस्टाग्राम चा वापर गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर होत आहे. इंस्टाग्राम वर सकाळ ते संध्याकाळ लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक सगळेजणच आपला वेळ घालवत असतात. इंस्टाग्राम वर आपल्याला उपयुक्त माहिती मिळतेच पण त्याचबरोबर आपले मनोरंजन देखील होत असते. इंटरनेटमुळे व इंस्टाग्राम मुळे आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये मनोरंजनाचा तडका आपल्याला पाहायला मिळतो.

इंस्टाग्राम देखील आपल्या यूजर्सला जास्तीत जास्त इंस्टाग्राम वापरणे सोपे व्हावे याकरिता वेगवेगळे फीचर्स ऍड करत असते. सध्या इंस्टाग्राम लाईव्ह ऍक्टिव्हिटी या फीचरची चाचणी इंस्टाग्राम कडून केली जात आहे. ही चाचणी हल्ली आयओएस या सिस्टम वर केली जात आहे. लवकरच ही चाचणी अँड्रॉइड सिस्टम वर देखील केली जाईल. नेमके इंस्टाग्राम कोणते फीचर्स नवीन आणणार आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

काही दिवसापूर्वीच मेटाने थ्रेड एप्लीकेशन लॉन्च केले होते. या ॲप्लिकेशनच्या लॉन्च केल्यानंतर कमी वेळातच ऐंशी दशलक्ष युजरने हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केले होते, त्याच दरम्यान थ्रेड एप्लीकेशन इंस्टाग्रामची जोडल्याने तुम्ही थेट इंस्टाग्रामच्या आयडीने लॉगिन करू शकता याशिवाय इंस्टाग्राम ने आता नवीन अपडेट करण्याचे ठरवलेले आहे. या अपडेट मुळे तुम्हाला नवीन फीचर्स वापरायला मिळणार आहे. सध्या या फीचर्स चाचणी आयओएस या सिस्टीमवर चाचणी करण्यात येत आहे. बहुतेक वेळा आपण एखादा व्हिडिओ किंवा पोस्ट अपलोड करत असताना ती किती अपलोड झालेली आहे, हे पाहण्यासाठी आपल्याला इंस्टाग्राम अँप्लिकेशन ओपन करावे लागत होते परंतु आता या नवीन फीचर्स मुळे तुम्हाला तुमच्या लॉक स्क्रीन वरच नोटिफिकेशन बारवर तुमची पोस्ट किती टक्के अपलोड होत आहे याची माहिती मिळणार आहे म्हणूनच सध्या तरी हे फीचर्स चाचणी करता वापरण्यात येत आहे.

काही दिवसापूर्वी इंस्टाग्राम नाही आपल्या युजरसाठी डाउनलोड हे ऑप्शन आणले होते. या ऑप्शनच्या मदतीने तुम्ही एखादा फोटो किंवा एखादी रील सहजरीत्या डाउनलोड करू शकता. पूर्वी एखादे गाणे किंवा व्हिडिओ डाऊनलोड करण्याकरिता आपल्याला थर्ड एप्लीकेशनची मदत घ्यावी लागायचे परंतु आता कसे करावे लागणार नाही. तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर जाऊन एखादा व्हिडिओ वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता याकरिता तुम्हाला तुमचा इंस्टाग्राम एप्लीकेशन अपडेट करणे गरजेचे आहे.

जर तुमच्याकडे ओल्ड वर्जन असलेले इंस्टाग्राम असेल तर तुम्हाला या फिचरचा लाभ घेता येणार नाही. तुम्ही ऑनलाईन मंडळाच्या वेबसाईटवर सध्या ट्रेडिंग असलेल्या नवीन बातम्या देखील वाचू शकता यामुळे सोशल मीडियावर घडत असणाऱ्या नवीन गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल. वरील माहिती आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत