Influencer Life

अंकिता वालावलकरने ज्येष्ठ अभिनेत्याला दिली मदतीची साद !

सोशल मीडिया हे असे प्रभावी माध्यम आहे की या माध्यमाचा उपयोग करून प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो. आपल्यापैकी अनेक जण फेसबुक, युट्युब, ट्विटर व इंस्टाग्राम वापरत असतात. इंस्टाग्राम वापरत असताना आपण करमणुकीचा भाग म्हणून इंस्टाग्राम वर वायरल होणारे व्हिडिओज म्हणजे रील पाहत असतो. सध्या तर इंस्टाग्राम वर सोशल मीडिया इन्फ्ल्यूसर यांचा मोठ्या प्रमाणात वावर आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे कंटेंट लोकांसाठी सादर करत असतो. या सर्वांमध्ये एक नाव प्रामुख्याने घ्यावे लागते ते म्हणजे अंकिता वालावलकर. अंकिता वालावलकर ही कोकण हार्टेडगर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. अंकिताने आतापर्यंत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट लोकांना दिलेला आहे. तिने दिलेला कंटेंट लोकांनी देखील आवडीने स्वीकारलेला आहे परंतु अंकिता फक्त कंटेंट क्रिएटर म्हणून नाहीतर ती एक माणूस म्हणून देखील तितकीच समृद्ध आहे याची प्रचिती नुकतेच एका प्रसंगावरून लोकांना दिसून आली.

गेल्या काही दिवसापूर्वी अंकिता एका शूटच्या निमित्ताने बाहेर शूट करत होती. या शूट च्या दरम्यानच अंकिताला चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते माहीमकर काका दिसले. माहीमकर काका यांनी आतापर्यंत चित्रपट सृष्टी मध्ये छोट्या-मोठ्या अनेक भूमिका केलेल्या आहेत. आपल्या भूमिकेमुळे त्यांचे वेगळेपण व एक विनोदी ज्येष्ठ अभिनेता म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जाते. शुट सुरू असताना अंकिताने त्यांना या शूट मध्ये सहभागी होण्याची विनंती केली. कोणत्याही क्षणाचा विलंब न करता माहीमकर काकांनी कपडे बदलून शूट मध्ये सहभाग घेतला, त्याचबरोबर माहीमकर यांनी अंकिता कडे एक विनंती देखील केली ते म्हणाले की, पोरी मला काम देशील का? असे विचारत असताना माहीमकर काकांच्या डोळ्यांमध्ये पाणी देखील होते. माहीमकर काका म्हणाले की, मी गेल्या अनेक वर्षापासून चित्रपटांमध्ये काम करत असलो तरी माझं स्वतःचं असं कुटुंब नाही. मला माझा एकटेपणा दूर करण्यासाठी कामाची आवश्यकता आहे माझं लग्न झालेले नाही आणि मला म्हातारपणात काम करणे अत्यंत गरजेचे आहे.

मला इच्छा मरण घायचे पण ते भारतात शक्य नाहीये. जर तुझ्याकडून काही शक्य झाले तर तू मला काम मिळून दे..अशावेळी अंकिताला काय बोलावं हे देखील सुचत नव्हतं तरी देखील ती म्हणाली की मी वयाने लहान आहे तरी मी तुम्हाला काम मिळून देईल इतकी मोठी नाही, तरीही मी माझ्या चित्रपट सृष्टी मध्ये काही ओळखी आहेत. त्यांच्या मदतीने तुम्हाला नक्कीच काम मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.

आजही आपले आयुष्य चित्रपटसृष्टीला ओवाळून दिलेले अनेक अभिनेता त्यांच्यावर जगण्याकरिता कुणाकडे काम मागण्याची वेळ येत आहे हे ऐकून व पाहून अंकिताला खरेच वाईट वाटले परंतु अंकिताने माहीमकर काकांना धीर देखील दिला. या प्रसंगावरून अंकिता फक्त कंटेट क्रिएट करायचे म्हणूनच क्रिएट करत नाही तर त्यामागील महत्त्वाची भूमिका देखील लोकांसमोर मांडत असते. एक माणूस म्हणून इतरांच्या भावना व इतरांना मदत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे व याचे सामाजिक भान ठेवूनच अंकिता आपल्याला वागताना दिसत आहे, असे म्हणायला हरकत नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वीच अंकिताचे काही व्हिडिओज देखील व्हायरल झाले होते. त्या व्हिडिओमध्ये केईम हॉस्पिटल मधील घडलेला एक प्रसंग तिने सांगितला होता. जर तुम्ही देखील अंकिता चे व्हिडिओज आतापर्यंत पाहिले नसतील तर तिच्या युट्युब किंवा इंस्टाग्राम वरील ऑफिशियल अकाउंट वर भेट देऊन तुम्ही सहज पाहू शकता.