Life Technology

मोबाईलचा अतिवापर करताय? हे तोटे माहिती आहेत का ?

मित्रांनो, आपण हल्ली तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगत आहोत. आपल्याकडे एकापेक्षा जास्त गॅजेट असतात. दैनंदिन आयुष्य जगत असताना आपण कॉम्प्युटर, मोबाईल फोन, स्मार्टफोन टॅबलेट इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट वापरत असतो. या सर्व गॅजेटचा वावर आपल्या आजूबाजूला 24 तास असतो परंतु या सर्व उपकरणाचा वापर करताना अनेकदा आपण नको त्या गोष्टींच्या सवयींच्या नादामध्ये अडकतो व आपले जीवन उध्वस्त होऊन जाते. इंटरनेट वापरत असताना आपण जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करत असतो. सोशल मीडिया म्हटले की फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब व अन्य प्लॅटफॉर्म यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर केला जातो. आजची पिढी तर फेसबुक इंस्टाग्राम वर तासनतास घालवत असते. दिवसभर रील पाहिल्याने कधी आपला दीड-दोन जीबी संपून जातो, हे देखील तरुणांना कळत नाही परंतु दिवसभरात जास्तीत जास्त सोशल मीडिया व मोबाईल फोनचा वापर करणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते.

इंटरनेटच्या माध्यमांमुळे जग जवळ आले असले तरी आपण आपल्या व्यक्तींपासून लांब जात आहोत हे देखील तितकेच खरे आहे. आज आम्ही तुम्हाला सोशल मीडिया जास्त वापरल्यामुळे आपल्या जीवनात नेमके काय तोटे होतात याबद्दलची माहिती सांगणार आहोत.

माहिती व तंत्रज्ञान यांचा विकास झाल्याने सोशल मीडियाचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. हल्ली लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण मोबाईलवर खूप वेळ घालवत असतो. मोबाईलवर वेगवेगळे व्हिडिओ पाहणे यामुळे देखील लहान मुले बिघडण्याची शक्यता जास्त असते. अनेक जण तर जेवण करताना देखील मोबाईल वापरतात, असे केल्याने जेवणाकडे दुर्लक्ष होते. पोटाच्या समस्या निर्माण होतात. आपल्या आजूबाजूला असे अनेक मंडळी आहेत जे टॉयलेट, वॉशरूमला जाताना देखील मोबाईल घेऊन जातात. या सर्व प्रकारांमुळे कधी आपल्याला सवयींचे व्यसन मध्ये रूपांतर होते हे देखील कळत नाही. एकदा का तुम्हाला मोबाईल फोनचे व्यसन लागले की ही सवय दूर करणे मुश्किल होऊन जाते.

घर असो किंवा टायलेट किंवा ऑफिस यासारख्या ठिकाणी बहुतेक वेळा आपण मोबाईल लॅपटॉप यांचा वापर करत असतो. या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅक्टेरिया देखील आपल्याला पाहायला मिळतात. हे असे बॅक्टेरिया आपल्या डोळ्यांना दिसत नाही, परिणामी जास्तीत जास्त वापर केल्याने हे सर्व बॅक्टेरिया आपल्या हाताला लागतात आणि आपल्याला हानिकारक ठरतात. आणि जण टॉयलेट मध्ये गेल्यावर मोबाईल फोनचा वापर करतात अशावेळी देखील अनेक बॅक्टेरिया पोटात जाण्याची शक्यता असते यामुळे पोटाचे विकार जसे की बद्धकोष्ठता, लघवीचे विकार होण्याची शक्यता असते.

मोबाईल फोनवर सोशल मीडिया जास्त वापरताना अनेकदा आपल्या शरीराची जडणघडण देखील बिघडून जाते. चुकीच्या पद्धतीने तासन तास बसल्याने आपल्याला मणक्याचे आजार,कमरेचे आजार उद्भवतात परिणामी हाडांचे आजार भविष्यात त्रास देऊ लागतात. मोबाईल मध्ये पाहिल्याने आपल्या मानेवर देखील प्रेशर निर्माण होतो यामुळे मानाचे आजार होतात तसेच मोबाईल फोनची स्क्रीन लहान असल्याने आपण एकटक स्क्रीन कडे पाहत असतो, यावेळी आपल्या डोळ्यांना ताण सहन करावा लागतो. वारंवार डोळ्यांची हालचाल न झाल्याने भविष्यात नजर कमी होणे, डोळ्यांना अस्पष्ट दिसणे, चष्म्याचा नंबर वाढणे परिणामी मोतीबिंदू यासारख्या अनेक समस्या तुम्हाला होऊ शकतात.

मोबाईल फोन वापरत असताना आपण अनेकदा वाय-फाय इंटरनेट यासारखे कनेक्शन वापरत असतो यामुळे तुम्हाला निद्रानाश आजार होऊ शकतो कारण की इंटरनेट वाय-फाय कनेक्शन वापरत असताना मोठ्या प्रमाणावर जे काही नेटवर्क लहरी असतात त्या आपल्या आजूबाजूला फिरत असतात. यामुळे आपल्या शरीरावर तसेच मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. जर तुम्ही देखील जास्तीत जास्त वेळ मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट वापरत असाल तर आत्ताच सावधान व्हा, अन्यथा भविष्यात तुम्हाला अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.