Technology

व्हाट्सएप ने लॉन्च केले नवीन फीचर्स, “या” ट्रिक ने एडिट करू शकता चुकून सेंड केलेला मेसेज !

आपल्यापैकी अनेक जण एकमेकांना मेसेज करण्यासाठी व्हाट्सअप ॲप्लिकेशनचा वापर करत असाल किंबहुना या ॲप्लिकेशनच्या मदतीशिवाय आपण एकमेकांशी कनेक्ट राहू शकत नाही. सध्याच्या घडीला दिवसभरातून अनेकदा आपण कामाचे मेसेज एकमेकांना पाठवत असतो. गुड मॉर्निंग पासून ते गुड नाईट पर्यंत शुभेच्छाचे मेसेज देखील एकमेकांना पाठवत असतो, अशावेळी कळत नकळत अनेकदा चुकीचा मेसेज देखील समोरच्या व्यक्तीला पाठवला जातो. चुकीचा मेसेज समोरच्या व्यक्तीला पाठवल्याने गैरसमज होण्याची शक्यता देखील असते, अशावेळी जर तुमच्या बाबतीत देखील असे काही घडत असेल तर आता चिंता करू नका.

व्हाट्सअप ऍप्लिकेशन ने एक नवीन फिचर आणलेले आहे या फीचरच्या माध्यमातून तुम्ही पाठवलेला मेसेज एडिट करू शकता त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील व या सोप्या सोप्या ट्रिक्स च्या मदतीने तुम्ही पाठवलेला मेसेज देखील एडिट करू शकता.

खूप दिवसाच्या कालावधीनंतर व्हाट्सअप ने पुन्हा एकदा एडिट फीचर लॉन्च केले आहे. हे फीचर अशा लोकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे जे अनेकदा मेसेज पाठवताना चुका करतात. आता जरी तुमच्या कडून भविष्यात चूक झाली तरी घाबरण्याचे कारण नाही. या फीचर मुळे तुम्ही पाठवलेला मेसेज मध्ये योग्य वेळी योग्य बदल देखील करू शकता.

या नवीन फीचर ला व्हाट्सअप ने व्हाट्सअप एडिट असे नाव दिलेले आहे.

हे फिचर लॉन्च करताना कंपनीने काही नियम व अटी देखील लागू केल्या आहेत. या नियमांचे तुम्हाला पालन करावे लागणार आहे. याचाच अर्थ की तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखादा मेसेज पाठवल्यानंतर पंधरा मिनिटाच्या आत तुम्ही तो मेसेज एडिट करू शकता त्यानंतर तुम्हाला पाठवलेल्या मेसेज मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही, अशावेळी तुम्हाला चुकून पाठवलेल्या मेसेजला डिलीट करावा लागेल.

या नवीन आलेल्या बदलामुळे व्हाट्सअप यूजर ना व्हाट्सअप ऍप्लिकेशन वापरताना सोपे जाणार आहे. कोणत्याही प्रकारच्या अडचणी शिवाय आता हे ॲप्लिकेशन सर्वांना वापरता येणार आहे, म्हणून सगळीकडे आनंदाचे वातावरण देखील आहे तसेच जर तुम्ही एखादा मेसेज चुकीच्या पद्धतीने पाठवलेला असेल किंवा काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते देखील तुम्ही सहज बदल करू शकता.

हे नवीन फीचर तुम्हाला वापरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या चॅट मध्ये जावं लागेल आणि त्यानंतर चॅटवर तुम्हाला लॉंग प्रेस करायचे आहे. असे केल्यानंतर तुम्हाला एडिट ऑप्शन दिसू लागेल. या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधी पाठवलेला मेसेज वर योग्य तो बदल करता येणार आहे, अशा प्रकारे काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहजच मेसेज एडिट करू शकता.

जेव्हा तुम्ही एखाद्या मेसेज एडिट कराल तेव्हा त्या मेसेजवर तुम्हाला edited असे लेबल देखील पाहायला मिळेल. याचा अर्थ समोरच्या व्यक्तीला कळेल की तुम्ही मेसेजमध्ये काहीतरी बदल केलेला आहे म्हणूनच जर तुमच्याकडून चुकून काही समोरच्या व्यक्तीला पाठवला गेला असेल तर आता चिंता न करता मेसेज एडिट करून तुम्ही समोरच्या व्यक्तीला योग्य तो मेसेज पाठवू शकता.