Technology

वीपीएन म्हणजे नेमके आहे तरी काय? ब्लॉक झालेल्या वेबसाईट अनब्लॉक कशा होतात?

२००० सालानंतर आपल्याला इंटरनेटच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते. कालांतराने इंटरनेट आपल्या जीवनाचा भाग बनलं आहे. सध्याची परिस्थिती इतकी वेगळी आहे की जर आपल्या मोबाईल मध्ये इंटरनेट व नेटवर्क नसेल तर आपल्या जीव कासावीस होतो. आपले सर्व कामे थांबून जातात. आणि म्हणूनच सध्या इंटरनेट आणि त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग तर आहे पण त्याचबरोबर श्वास बनलेला आहे असे देखील म्हणायला हरकत नाही. इंटरनेटचा वापर करत असताना अशा अनेक काही महत्त्वाच्या संज्ञा असतात किंवा घटक असतात जे इंटरनेटला सुरक्षित ठेवत असतात. या सर्वांच्या माध्यमातून इंटरनेट व्यवस्थित रित्या कार्य करते.आज आपण वीपीएन बद्दल जाणून घेणार आहोत. हे एक नेटवर्क चे प्रकार आहे यालाच आपण वर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणतो. या नेटवर्कच्या मदतीने आपण आपला डेटा अगदी सुरक्षित ठेवू शकतो. मोठ्या मोठ्या कंपनी वीपीएनच्या माध्यमातूनच आपल्या कंपनीचा डेटा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

या वीपीएन बद्दल तुमच्या मनात देखील काही शंका असतील किंवा ही वीपीएन नेमकी कशा प्रकारे कार्य करते तर आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती सांगणार आहोत.

इंटरनेटचा वापर करत असताना तुम्ही अनेकदा वीपीएन हे नाव ऐकले असेल. या नेटवर्कच्या मदतीने आपण इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतो. सध्या तर इंटरनेटच्या मदतीने आपण मोठे मोठे व्यवहार एकमेकांना पैसे ट्रान्सफर करणे इत्यादी गोष्टी करत असतो. या सर्वांसाठी इंटरनेटची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. ऑनलाइन सेक्युरिटी किंवा आपली प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यासाठी वीपीएन मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

वर्चुअल म्हणजेच वर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क आहे, जे तुमच्या कंपनीसाठी मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरते. ही एक प्रणाली आहे जे तुमच्या असुरक्षित नेटवर्कला सुरक्षित नेटवर्क बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते म्हणजेच वीपीएन तुमचे लोकेशन आणि तुमचे आयडेंटिटी लपवण्यासाठी मदत करते.

जर तुम्ही हे नेटवर्क वापरत असाल तर तुम्हाला कोणतेच आयपी ऍड्रेस तुम्हाला ट्रेक करू शकत नाही. वीपीएन यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटी लपवू शकता तसेच तुम्हाला प्रतिबंधित केलेल्या सेवा आणि वेबसाईट पर्यंत पोहोचण्याची परवानगी देते.

वीपीएन कसे प्रकारे काम करते हे जाणून घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण आपल्या ब्राउझरमध्ये एखाद्या वेबसाईटचे यु आर एल टाकतो तेव्हा सर्वात पहिले रिक्वेस्ट आयएसपी म्हणजेच इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर कडे जाते. येथे तुमची ऑनलाईन आयडेंटिटी डिवाइस आयडी आणि लोकेशन यासारख्या अनेक गोष्टी चेक केल्या जातात त्यानंतरच तुम्हाला त्या वेबसाईट शी जोडण्यात येते हे सर्व आयएसपीच्या माध्यमातून घडत असते.

हे तर नेटवर्क प्रणाली तुमची ऑनलाईन प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते, यामुळे तुमच्या प्रायव्हसीला व तुमच्या डेटा ला कोणताही प्रकारचा चोरांपासून धोका नसतो तसेच डेटा इन्क्रिपश न आणि डिस्क्रिप्शन अल्गोरिदमचा वापर देखील मोठा प्रमाणात केला जातो जेणेकरून तुम्ही काय करत आहात याचा पत्ता कोणाला लागणार नाही.

जर तुम्ही मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करत असाल तर तुम्हाला वीपीएन वापरणे अत्यंत गरजेचे आहे तसेच जर फक्त तुम्ही मनोरंजनाच्या हेतूने इंटरनेटचा वापर करत असाल तर व्हीपीएनची आवश्यकता नाही परंतु जर तुम्ही ऑनलाईन बँकिंग, शेअर मार्केट आणि क्रिप्टो करेंसी यासारख्या ठिकाणी जास्त वेळ घालवत असेल तर तुम्हाला वीपीएन वापरणे आवश्यक आहे.