Technology

ट्विटरला टक्कर देण्यासाठी आले इंस्टाग्रामचे थ्रेड एप्लीकेशन!

इंटरनेटचा विश्वामध्ये सेकंदा सेकंदाला काही ना काही अपडेट घडत असतात. या सर्व अपडेट ची माहिती आपल्याला एक वापरकर्ता म्हणून माहिती असायला पाहिजे, अन्यथा आपण काळाच्या मागे जाऊ शकतो. दैनंदिन जीवन जगत असताना आपण अनेकदा सोशल मीडिया वापरत असतो. सोशल मीडियाचा वापर करत असताना इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, लिंकड इन यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटचा प्रामुख्याने वापर देखील केला जातो. आज इंटरनेटच्या विश्वामध्ये एक नवीन ट्रेंड निर्माण झालेला आहे तो म्हणजे ट्विटरला टक्कर देण्याकरिता इंस्टाग्राम एप्लीकेशन निर्माण केलेले आहे. या ॲपच्या माध्यमातून वापर करताना वेगवेगळ्या सुविधा देखील मिळणार आहे. या थ्रेडची चर्चा आज दिवसभरातून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे आणि हे एप्लीकेशन लॉन्च करताच लाखो लोकांनी या थ्रेड एप्लीकेशनला पसंती देखील दिलेली आहे.

थ्रेड एप्लीकेशन हे एक नवीन सोशल नेटवर्किंग एप्लीकेशन आहे. याची तुलना थेट ट्विटर सोबत केली जात आहे. हे ॲप्लिकेशन अगदी ट्विटर सारखे आहे, सोबतच या एप्लीकेशनचे काही फीचर्स इंस्टाग्राम सोबत जोडण्यात आलेले आहे. तसे पाहायला गेले तर काही दिवसापूर्वी ट्विटर ने आपले पेड व्हर्जन बाजारामध्ये आणले आणि यामुळेच ट्विटर वापर करणाऱ्यांची संख्या देखील वेगाने कमी झालेली आपल्याला पाहायला मिळाली म्हणूनच इंस्टाग्राम ने आपले युजर वाढवण्याच्या नादामध्ये थ्रेड एप्लीकेशन बाजारामध्ये आणलेले आहे आणि या एप्लीकेशन मुळे ट्विटरला नवीन टक्कर देणार स्पर्धक देखील निर्माण झालेला आहे असे म्हटले जात आहे.

थ्रेड एप्लीकेशन तुम्हाला डाऊनलोड करण्याकरिता कोणत्याही प्रकारची सिस्टम असणे गरजेचे आहे उदाहरणार्थ अँड्रॉइड किंवा आयओएस प्लॅटफॉर्मवर थ्रेड एप्लीकेशन उपलब्ध आहे. हे एप्लीकेशन डाऊनलोड करण्याकरता तुम्हाला एप्पल ॲप स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअर च्या माध्यमातून तुम्ही डाउनलोड करू शकता तसेच याशिवाय वापर करते थ्रेड डेस्कटॉप वर साईटच्या माध्यमातून वापर करू शकता.

थ्रेड वापर करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी देखील घ्यावी लागणार आहे जसे की या एप्लीकेशनच्या माध्यमातून तुम्ही 500 कॅरेक्टर मध्ये तुमची पोस्ट या एप्लीकेशन वर पोस्ट करू शकता. येथे तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी पर्याय देखील देण्यात आलेला आहे तसेच काही दिवसांपूर्वी ट्विटरवर देखील फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती परंतु युजर थ्रेड एप्लीकेशन वर पाच मिनिटापर्यंत व्हिडिओ सहजच पोस्ट करू शकतात. हे ॲप्लिकेशन वापरण्याकरीता तुम्हाला वेगळे अकाउंट बनवावे लागणार नाही. याकरिता तुम्हाला प्ले स्टोर मधून तुम्हाला थ्रेड एप्लीकेशन डाउनलोड करावे लागणार आहे आणि त्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही लॉगिन व्हाल. लॉग इन करण्याकरता तुम्हाला पासवर्ड ठेवण्याची देखील आवश्यकता नाही.

हे थ्रेड एप्लीकेशन डाऊनलोड केल्यानंतर वापर करताना एक यादी दिसू लागेल. या यादीच्या माध्यमातून तुम्ही अनेकांना फॉलो करू शकता तसेच या एप्लीकेशन मध्ये तुम्हाला तुमचे प्रोफाईल प्रायव्हेट किंवा पब्लिक देखील करता येणार आहे. सध्या तरी हे एप्लीकेशन तुम्हाला बिना जाहिरातीचे पाहायला मिळणार परंतु जसजसे हे एप्लीकेशन लोकांकरिता सोपे होईल व जुने होईल त्यानंतर येथे देखील ऍडव्हर्टायझिंग तुम्हाला दिसायला लागेल.

थ्रेड एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

एप्लीकेशनच्या लूक बद्दल बोलायचे झाल्यास हे एप्लीकेशन अगदी दिसायला इंस्टाग्राम सारखे आहे. इंस्टाग्रामच्या काही फीचर्स देखील तुम्हाला येथे पाहायला मिळणार आहे. एकंदरीत काय ट्विटर साठी हे थ्रेड एप्लीकेशन स्पर्धक म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता हे थ्रेड एप्लीकेशन वापरकर्त्यांसाठी कसे महत्त्वपूर्ण ठरणार आहे हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.