Influencer Technology

तन्मय पटेकर – सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर | Tanmay Patekar Story

Tanmay Chandramohan Patekar

हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येक जण सोशल मीडियावर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सक्रिय पाहायला मिळतो. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल तर हमखास मिळतो आणि या मोबाईल मध्ये इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हाट्सअप ऍप्लिकेशन यासारखे अनेक एप्लीकेशन आपल्याला पाहायला मिळतात. इंस्टाग्राम आणि युट्युब यांच्यावर तर व्हिडिओचा खच पडलेला आपल्याला पाहायला मिळतो, परंतु या सर्वांमध्येच आपल्याला इंस्टाग्राम वर असे काही व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यांच्यामुळे आपले मनोरंजन तर होतेच पण त्याचबरोबर अनेकदा सामाजिक भान देखील राखले जाते. इंस्टाग्राम वापरत असताना, रिल पाहताना आपल्याला अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर यांच्याशी आपला संपर्क येत असतो. त्यांचे व्हिडिओ आपण पाहत असतो. असे अनेक अकाउंट आपण आवर्जून फॉलो देखील करत असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका इंस्टाग्राम इन्फ्ल्यून्सर बद्दल माहिती सांगणार आहोत.

आज आपण जा डिजिटल व्हिडिओ क्रिएटर म्हणजेच सोशल मीडिया इनफ्लून्सर बद्दल जाणून घेत आहोत ज्याचे नाव आहे तन्मय चंद्रकांत पटेकर. तन्मय हे नाव गेल्या अनेक वर्षापासून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. तन्मयने आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तरुणाईच्या मनामध्ये आपले आगळे स्थान देखील निर्माण केले आहे. इंस्टाग्राम वर तन्मयचे 571 k फॉलॉवर आहेत. तन्मय ने आता पर्यंत 2042 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. तन्मयच्या व्हिडिओचे वेगळेपण म्हणजे तन्मय हा नेहमी सामाजिक भान ठेवून व्हिडिओंची निर्मिती करत असतो. या व्हिडिओची निर्मिती करत असताना स्त्री – पुरुष समानता, महिला सक्षमीकरण, स्त्रीशक्ती, आईच्या वेदना, वडिलांचे प्रेम, तृतीय पंथ यांच्या भावना, समाजातील दुर्बल दुर्लक्षित घटक अश्या दैनंदिन जीवनातील छोटे – मोठे प्रसंग वापरून तन्मय इंस्टाग्राम वर व्हिडिओ बनवत असतो. तन्मय द्वारे बनवल्या गेलेल्या व्हिडिओना चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते.

अनेकदा आपल्याला तन्मय वेगवेगळ्या जाहिरातीचे प्रमोशन करताना देखील दिसून येतो. नुकतेच त्याने “स्वामी समर्थ माऊली” या गाण्याचे शूट देखील पूर्ण केलेले आहे. या गाण्यातून फक्त देवाची भक्ती स्टेटस पुरताना ठेवता मानवी सेवा करून व समाजामध्ये राहून आपण इतरांची सेवा करून स्वामी समर्थांची पूजा अर्चना करू शकतो असा सामाजिक संदेश देखील दिलेला आहे. या गाण्यांमध्ये तन्मय आपल्याला सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक सोबत पाहायला मिळत आहे. यापूर्वी देखील तन्मयने अनेक सुप्रसिद्ध अभिनेता व अभिनेत्री यांच्यासोबत काम केलेले आहेत आणि या सर्व त्याच्या कामाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक देखील केले जात आहे.

जेव्हा जेव्हा तन्मय इंस्टाग्राम वर व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळत असते. चाहते त्याच्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर देखील मोठ्या प्रमाणावर करत असतात. कुठेतरी संवेदना हरवत असलेल्या विश्वात संवेदना निर्माण करण्याचे कार्य तसेच माणूस म्हणून इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन तन्मय आपल्या व्हिडिओतून निर्माण करत असतो आणि हीच दृष्टी समाज घडवण्यासाठी महत्त्वाची ठरेल असा तन्मयचा देखील विश्वास आहे. जर तुम्ही देखील तन्मय चे व्हिडिओ अद्याप पाहिले नसेल तर तन्मयच्या इंस्टाग्राम वरील @tanmaypatekar2424 या ऑफिशियल अकाउंट वर एकदा अवश्य भेट द्या.

तन्मय इंस्टाग्राम वर आपल्याला सक्रिय तर दिसतोच पण त्याचबरोबर त्याचे स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील आहेत. या यूट्यूब चॅनल वर तो व्हिडिओ अपलोड करत असतो. जर आपण इंस्टाग्राम वर त्याच्या अकाउंट वर भेट दिल्यावर आपल्याला एक वाक्य आवर्जून दिसून येते ते म्हणजे “फक्त जाण ठेवा!” या वाक्यावरूनच तन्मयचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. तन्मयची असलेली आत्मीयता आपल्याला समजून येते आणि तन्मय फक्त व्हिडिओ बनवून पैसे कमवण्याचे साधन म्हणून या व्यासपीठाकडे न पाहता एक सामाजिक व आपली जबाबदारी म्हणून देखील पाहतो हे सिद्ध होते.