Technology

पावसाळ्यात AC वापरताना या गोष्टींची काळजी अवश्य घ्या !

मित्रांनो आपल्या सर्वांच्या घरी हल्ली एसी हमखास पाहायला मिळतो. एसी हे असे साधन आहे, ज्यामुळे आपल्याला उकाड्यापासून आरामात सुटका मिळते. उकाड्याने दिवस संपलेले आहेत. पावसाळ्याचे दिवस सुरू देखील झालेले आहे परंतु पाऊस म्हणावा तितका काही पडत नाहीये. वातावरणामध्ये उकाडा जाणवतोच आहे, अशावेळी आपल्या घरामध्ये लावलेला एसी आपण या दिवसात देखील वापरत असतो. एसी लावल्याने घरातील वातावरण थंड राहते आणि आपल्या जीवाला देखील बरे वाटते. तुमच्या सर्वांच्या घरी एसी असेल तर या पावसाळ्याच्या दिवसात एसी वापरताना आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे याची फारशी माहिती नसते. जर आपण या गोष्टींची माहिती घेतली नाही तर एसीचे तापमान कमी जास्त होऊ शकते, परिणामी एसी मुळे शरीरावर समस्या निर्माण होऊ शकतात म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसात शरीराची काळजी व वापरतांना नेमक्या कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे याबद्दल सविस्तरपणे माहिती सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

पावसाळ्याच्या दिवसात वातावरणातील आद्रता कमी जास्त झालेली आपल्याला पाहायला मिळते, अशा वेळी शरीरावर घाम देखील जास्त येतो. घामापासून सुटका मिळवण्यासाठी कामाच्या ठिकाणी व घरामध्ये एसीचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. एसी लावल्यावर आपल्या जीवाला बरे देखील वाटते व शरीरावर निर्माण झालेला घाम काही मिनिटांमध्ये दूर होऊन जातो परंतु अशा वातावरणामध्ये एसीचे तापमान नेमके किती व कसे ठेवायचे? याबद्दल अनेकांना माहिती नसते.

पावसाच्या दिवसात जेव्हा आपल्या शरीरावर घाम निर्माण होतो तेव्हा हा घाम लवकर सुकत नाही अशावेळी त्वचेचे वेगवेगळे विकार आपल्याला होण्याची शक्यता असते. शरीराची आद्रता, तापमान देखील वाढून जाते परिणामी अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते.

तज्ञांच्या मते पावसाळ्याच्या दिवसात एसी चा वापर करणे जरी चांगले असले तरी जास्त वापर करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते आणि म्हणूनच जर या दिवसांमध्ये आपण एसीचा वापर जास्त करत असू तर आपल्याला एसी ड्राय मोडवर वापरलेला नेहमीच बरा परंतु असे जास्त वेळ करू नये.

सर्वसाधारणपणे एसीचे टेंपरेचर 24 ते 26 डिग्री सेल्सिअस मध्ये ठेवणे अत्यंत चांगले मानले जाते. रात्रीच्या वेळी देखील तुम्ही हेच टेंपरेचर ठेवू शकता परंतु रात्रीच्या वेळी किंवा दिवसा जास्तीत जास्त वापर केला तर तुम्हाला अनेक समस्या देखील उद्भवू शकतात जसे की तुमच्या शरीरामध्ये जो कोमल पणा आहे तो कमी होऊ शकतो. तुमची त्वचा कोरडी पडू शकते यामुळे त्वचेवर खाज निर्माण होणे, लाल चट्टे निर्माण होणे अशा प्रकारचे अनेक तशा विकार तुम्हाला उद्भवू शकतात.

पावसाळ्यात दिवसात अनेकदा बाहेर फिरल्यामुळे आपल्याला सर्दी खोकला यासारखे व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते अशावेळी आपण आपल्या शरीर लवकर वाळायला हवे याकरिता एसीचा वापर करतो परंतु असं करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. पावसाळ्यात भिजून आल्यानंतर नेहमी स्वच्छ पाण्याने आपले शरीर धुवायला पाहिजे आणि त्यानंतर शरीरावर मॉइश्चरायझर देखील लावायला हवे, असे केल्याने तुमच्या शरीरावर घाम व कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन असेल तर ते निघून जाईल तसेच खाण्यापिण्याच्या गोष्टीवर साफसफाईवर आपल्याला ध्यान ठेवणं आवश्यक आहे,अशा काही गोष्टींची काळजी तुम्ही घेतल्यास पावसाळ्यामध्ये देखील घरामध्ये एसी चालू असताना तुमचे शरीर अगदी निरोगी राहू शकते.