Technology

तुमच्या नावावर दुसरे कोणी सिम कार्ड वापरत आहे का? असे शोधून काढा !

सध्या मोबाईल फोन शिवाय आपले जीवन अपूर्ण आहे परंतु मोबाईल फोन, स्मार्टफोन चालवण्यासाठी आपल्याला सिम कार्डची आवश्यकता लागते. सिम कार्ड हे असे कार्ड आहे या कार्डच्या मदतीने आपण एकमेकांशी संपर्क साधू शकतो. एकमेकांशी फोनवर बोलू शकतो. याच सिम कार्ड मुळे आपल्याला दहा आकडी नंबर मिळतो आणि हाच नंबर कालांतराने आपली ओळख बनते. या नंबरच्या माध्यमातूनच आपण लोकांशी संवाद करत असतो परंतु मोबाईल फोन विकत घेतल्यानंतर आपल्याला त्याकरिता सिम कार्ड देखील घ्यावा लागतो. हे सिम कार्ड विकत घेण्याकरिता आधार कार्ड, वोटर कार्ड व अन्य काही पुरावे आपल्याला दुकानात जमा करावे लागतात आणि त्यानंतर काही तासांमध्येच आपले सिम कार्ड चालू होते. सिम कार्ड विकत घेतल्यावर आपण आपले अनेक डॉक्युमेंट जमा करत असतो परंतु हे डॉक्युमेंट जमा केल्यावर या डॉक्युमेंटचा काही चुकीचा उपयोग तर होणार नाही ना? किंवा याच कागदपत्रांच्या मदतीने आपल्या नावावर कोणी दुसरा व्यक्ती सिमकार्ड तर विकत घेणार नाही ना? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण होत असतात. जर तुमच्या मनामध्ये देखील असे प्रश्न निर्माण होत असेल तर या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुमच्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत व किती सिम कार्ड वापरात आहेत याची माहिती तुम्ही एका मिनिटांमध्ये घरबसल्या मिळवू शकता चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…

तुम्हा सर्वांना माहितीच आहे की, आधार कार्ड, वोटिंग कार्ड यासारख्या कागदपत्रांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर सायबर क्राईम फ्रॉड होताना दिसत आहेत. अनेकदा या कागदपत्रांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून आपल्याला फसवले देखील जाते आणि म्हणूनच अशा प्रकारचे कागदपत्र जमा करताना आपल्याला खबरदारी देखील बाळगणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर च्या मदतीने तुमच्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर केले गेले आहेत. हे सिम कार्ड वापरत आहेत की नाही याची माहिती देखील सहजच एका क्लिकवर मिळवू शकता.

भारत सरकारचे दूरसंचार विभाग खूपच सक्रिय असते. दूरसंचार विभाग आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशाप्रकारे पुरवता येतील व ग्राहकांची फसवणूक होऊ नये याकरिता नेहमीच मदत करत असते, याकरिता दूरसंचार विभागाने एक पोर्टल देखील लाँच केले आहे. या पोर्टलच्या मदतीने तुम्ही तुमच्या नावावर असलेले सिम कार्ड व त्यांची माहिती सहजच जाणून घेऊ शकता. तुम्ही ही वेबसाईट मोबाईल फोन किंवा लॅपटॉप च्या मदतीने सहजच हाताळू शकता. या वेबसाईटचे नाव पुढीलप्रमाणे आहे

tafcop.dgtelecom.gov.in

आपल्या नावावर असलेले सिमकार्ड जाणून घेण्यासाठी आपल्याला दूरसंचार विभागाच्या वेबसाईटवर जावे लागेल. तिथे गेल्यावर आपल्याला आपल्या दहा आकडी मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी नंबर येईल. हा OTP नंबर वेबसाईटवर टाकल्यावर स्क्रीनवर तुमच्या नावावर असलेले सर्व सिम कार्ड दिसून येतील व संपूर्ण रेकॉर्ड तुम्हाला एका क्लिकवर दिसून येईल.

जर तुमच्या नावावर खूप सारे सिमकार्ड असतील आणि एखादे सिमकार्ड तुम्ही सध्या वापरत नसाल किंवा तुम्हाला तो सिम कार्ड ब्लॉक करायचा असेल तर तुम्ही ब्लॉक देखील करू शकता, त्यानंतर सरकार या नंबरचा तपास करून विशिष्ट कालावधीमध्ये हा नंबर ब्लॉक करते परंतु याकरिता तुम्हाला पाठपुरावा देखील करावा लागतो.

तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, एका आयडीवर तुम्ही जास्तीत जास्त 9 सिम कार्ड विकत घेऊ शकता. काही ठराविक राज्यांमध्ये जसे की आसाम जम्मू-काश्मीर, उत्तर पूर्व राज्यांमध्ये एका आयडीवर तुम्हाला 6 सिम कार्ड घेता येतात. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आयडीच्या मदतीनेच म्हणजे जे काही कागदपत्र तुम्ही जमा केले होते, त्या कागदपत्रांच्या आधारावर ठराविक वेळेमध्ये ठराविक सिम कार्ड तुमच्या नावावर विकत घेऊ शकतात. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.