हल्ली सोशल मीडियावर सोशल मीडिया इन्फ्ल्यूनसर यांचा अख्खा बाजार मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक व्यक्ती कॅमेरा घेऊन व्हिडिओ बनवायला पुढे येत असतो परंतु यांच्यापैकी असे बोटावर मोजता येणारे सोशल मीडिया इन्फ्ल्यूनसर आहेत,जे सामाजिक भान राखतात. समाजामध्ये राहून आपली वेगळी प्रतिमा निर्माण करतात. या वेगळेपणामुळेच या व्यक्तींना वेगळेपण प्राप्त होतं. आज आपण अंकिता वालावलकर बद्दल जाणून घेणार आहोत.. गेल्या अनेक दिवसापासून अंकिता प्रसिद्ध आहे. तिने काही दिवसापूर्वीच ज्येष्ठ अभिनेता माहीमकर यांच्यासोबत तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओला फेसबुक मोठ्या प्रमाणावर लाईक करण्यात आला. अनेकांनी तो शेअर केला.
अंकिता वालावलकरने ज्येष्ठ अभिनेत्याला दिली मदतीची साद !
फेसबुकवर या व्हिडिओला वीस लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिले. या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येते की ज्येष्ठ अभिनेता माहीमकर काका अंकिताला एका शूट दरम्यान भेटतात. या दोघांची भेट झाल्यावर अभिनेता माहीमकर काका अंकिता कडे कामाची मागणी करतात तसेच इच्छा मरण मागताना दिसून येतात त्यानंतर या व्हिडिओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. आता अंकिताने पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने पडद्यामागील कलाकारांची खंत व्यक्त केलेली आहे. या वेळेला देखील लोकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. आजच्या लेखामध्ये नेमकं या व्हिडिओमध्ये अंकिताने काय सांगितलेले आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
या व्हिडिओमध्ये अंकिताने ज्येष्ठ अभिनेते माहीमकर काका यांच्या घरातील काही कागदपत्र आपल्याला दाखवले तसेच त्यांनी इच्छा मरणासाठी हायकोर्टला दिलेले विनंती पत्र देखील दाखवले परंतु हायकोर्टने हे पत्र स्वीकारले नाही तसेच तुम्हाला चांगले दिवस येतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील असा सल्ला देखील दिला. त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेता माहीमकर काका यांना अनेकांनी मदत केलेली आहे तसेच त्यांनी राज्य सरकारकडे महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळावा याकरिता केलेली मागणीचे एक आपल्याला त्याचे पत्र पाहायला मिळते. एखाद्या कलाकाराने स्वतःला पुरस्कार मिळावा यासाठी दिलेला अर्ज पाहून अनेकांना काळजात चर होऊ शकते कारण की एक कलाकार एखाद्या कलेसाठी आपले अख्खे आयुष्य वेचत असतो परंतु हे सारे करत असताना कलाकाराच्या उतरवयात येणारे अनेक अडथळे त्याला पाठी मागे टाकतात. हतबल करतात.
माहीमकर काकांच्या बाबतीत देखील तेच झाले. कौटुंबिक वाद, लग्न न केल्यामुळे कुणाची नसलेली साथ,काम नसणे या सर्व गोष्टींमुळे माहीमकर काका मागे राहिले तसेच इतके सगळे असताना देखील त्यांनी धीर मात्र काही सोडला नाही परंतु काळाच्या सोबत चालताना काका मागे राहिले. काकांना काम न मिळाल्याने त्यांचे उदरनिर्वाह होणे देखील आता कठीण होऊन बसलेले आहेत. अंकिताने या व्हिडिओमध्ये असे देखील म्हटले की अंकिताच्या मदतीने जिथे जिथे शक्य होईल तिथे काकांना काम मिळवण्याचा ती नेहमीच प्रयत्न करेल तसेच शूट मधून काही मिळणारे पैशातील काही वाटा ती देण्याचा प्रयत्न करेल.
या सर्व प्रसंगी अंकिताला प्रत्येक कलाकाराला मदत करणे शक्य होईल असेच नाही तर तिने या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व इन्स्टाग्रामवरील रील बनवणाऱ्या कलाकारांना एक विनंती देखील केली आहे की, व्हिडिओ बनवत असतानाच सामाजिक भान राखून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो त्यासाठी आपल्या आजूबाजूला जे निराधार व्यक्ती आहेत त्यांना देखील मदत करावी असा एक महत्त्वाचा सामाजिक संदेश देखील दिलेला आहे. एकंदरीत या व्हिडिओमध्ये माहीम कर काका यांच्या मनामध्ये असलेली खंत व त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या अनेक घटना अंकिताने दाखवलेल्या आहेत. या घटना पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच वाईट वाटेल आणि तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला एखादे निराधार व्यक्ती असेल तर त्यांच्या मदतीला नक्कीच धावून जाल.