Investment

सोन्याचे दागिने विकताना अशी काळजी घ्या अन्यथा येऊ शकते मोठी अडचण !

सोने म्हटले की अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. सोने खरेदी लवकर होत नाही. सोने खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसे देखील तितकेच मोजावे लागतात. गृहिणी असो किंवा तरुण मंडळी असो या सर्वांसाठी सोने अत्यंत महत्त्वाचे ठरते. आपल्यापैकी अनेक जण सोने म्हटले की त्यांचा जीव की प्राण असतो. अन्य धातूपेक्षा सोन्याला महत्त्व देखील तितकच आहे. अनेकदा आपण सोन्याच्या धातूपासून वेगवेगळ्या प्रकारचे डाग दागिने अलंकार बनवत असतो आणि आपली हौस पूर्ण करत असतो. काहींकडे वंशपरंपरेने आलेले डाग दागिने असतात. त्यांची कारागिरी, त्यांच्यावर असलेली डिझाईन अनेकदा आपल्याला दागिन्यांचे वेगळेपण दाखवून देते परंतु अनेक वेळा काही दागिने असे असतात,जे खूपच जुने झालेले असतात अशा वेळी सोनाराच्या दुकानाकडे जाऊन त्यांची पुन्हा बनावट करणे गरजेचे असते.

तुम्ही देखील तुमचे जुने सोने पुन्हा मोडून नव्याने बनवत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा तुमची फसगत होऊ शकते.अनेकदा सोने खरेदी विक्री करणाऱ्यांच्या दुकानात जेव्हा आपण जुने सोने विकायला जातो तेव्हा त्याच्या पक्षात आपल्याला रोख पैसे मिळतील असेच नाही यामागे देखील काही कारणे आहेत.

भारतासारख्या देशांमध्ये सोने खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि अडचणीला सोने कामात येते असे देखील आपल्या गृहिणी मंडळी म्हणत असतात आणि म्हणूनच जरी सोन्याचा भाव गगनाला भिडत असला तरी आपल्याकडे लोक हमखास सोने नाणे बनवत असतात यामुळे सोनारांचा व्यवसाय हा अगदी तेजीने चालत असतो त्यांना कधीच मंदी जाणवत नाही परंतु अनेकदा सोनू बनवत असताना व विक्री करत असताना त्याचे आपल्याला रोख पैसे मिळतील याची शक्यता नसते.

बहुतेक वेळा भारतामध्ये अनेक ज्वेलर्सही सोन्याचे किरकोळ विक्रेते असतात यामुळे दररोज विकली जाणारी वस्तू किरकोळ विक्रेते परत खरेदी करत नाही म्हणूनच आपल्याला सोन्याच्या दागिन्याच्या मागे योग्य ती रक्कम देखील मिळत नाह

बहुतेक दुकानांमध्ये सोन्याचे दागिने व वस्तू विकून त्या बदल्यात रोख रक्कम देण्याची योजना आपल्याकडे उपलब्ध असते. ही योजना फक्त ठराविक ज्वेलर्सकडेच असते म्हणूनच सोन्याची विक्री करत असताना आपल्याला दागिन्याच्या बदल्यात रोख रक्कम मिळत नाही.

जर तुम्हाला सोन्याची विक्री करायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे इन्व्हॉईस असणे गरजेचे आहे. इन्व्हॉईस म्हणजे सोने खरेदी केल्याचे पक्के बिल. अशावेळी जर तुमच्याकडे पक्के बिल नसेल तर तुम्हाला तुमचे दागिने विकता येत नाही कारण की त्या बिलामध्ये सोन्याची त्यावेळची किंमत, घडणावळ व त्यावेळी सोन्याचा असलेला भाव इत्यादी तपशील लिहिलेले असतात.

सोन्यावर हॉलमार्क असेल तर तुम्हाला त्याची किंमत मिळते परंतु जर हॉलमार्क नसेल तर ज्वेलर्स तुम्हाला योग्य ते किंमत देऊ शकत नाही. तुमच्याकडे बिल असणे गरजेचे आह. बिल मुळे तुमच्या सोन्याची शुद्धता कळून येते.

आपल्याकडे सोन्याचे भाव वाढल्यावर अनेक जण सोने खरेदी करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी पुढे येत असतात परंतु सोने खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसे तर मोजावे लागतात परंतु जेव्हा आपण खरेदी केलेले सोने विकण्यासाठी जातो तेव्हा तुम्हाला पैसे मात्र जास्त मिळत नाही कारण की अन्य देशांमध्ये असलेली मंदीचा परिणाम भारतामध्ये देखील पाहायला मिळतो आणि म्हणूनच तेलाचे वाढते दर यामुळे देखील सोने भाव वाढलेले आहे.

या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला सोन्याचा भाव जरी वाढला असेल तरी त्याची विक्री करताना तितकाच दर मिळेल याची शाश्वती नसते म्हणूनच शक्यतो ज्वेलर्स दागिने खरेदी करत नाही.

जर तुम्हाला सोने विकायचे असेल तर यासाठी तुम्हाला काही पर्याय देतील उपलब्ध आहेत अशावेळी तुम्ही गोल्ड एक्सचेंज ट्रेडमध्ये गुंतवणूक करू शकता किंवा गोल्ड सेविंग ची काही फंड असतात त्यामध्ये देखील वेगवेगळे पर्याय निवडून तुमची गुंतवणूक करू शकता म्हणून भविष्य जर तुम्हाला सोने विकायचे असेल तर काही गोष्टींची माहिती योग्य वेळी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.