Life

मेंढपाळ मुलाने मिळवली ब्रिटनमध्ये पीएचडी – संघर्ष कथा!

आपल्या आजूबाजूला असे अनेक तरुण आहेत, ज्यांनी संघर्षावर मात करून स्वतःला सिद्ध केलेले आहे. आपले वेगळे महत्त्व दाखवून दिलेले आहे परंतु आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, त्या व्यक्तीची माहिती जाणून घेतल्यावर तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू आल्या शिवाय राहणार नाही. या व्यक्तीने जन्मापासून संघर्ष केलेला आहे. जन्माच्या वेळी स्वतःच्या आईने स्वतःपासून वेगळे करताना ज्वारीच्या चिपाडाची मदत घेतली. या ज्वारीच्या चिपाडाच्या मदतीने त्याची नाळ कापण्यात आली परंतु यानंतर त्याच्या संघर्ष जीवनात आलेला संघर्ष सर्वांना थक्क करणारा आहे.

काही दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे आयोजन केले होते. ब्रिटन विद्यापीठातून पी एच डी करण्यासाठी ऑफर देण्यात आलेली आहे. आणि यानंतर या कार्यक्रमात सौरभ ने जे भाषण केले त्या भाषणाने अख्खा समूह वर्ग शांततेने थक्क झाला.

सौरभ हा मेंढपाळ समाजात जन्माला आलेलाएक युवक. या समाजात जन्मलेल्या समाजाची व्यथा देखील त्याने नेत्या समोर मांडली. सौरभच्या शिक्षणा बद्दल बोलायचे झाल्यास सौरभने कॉम्प्युटर सायन्स या विषयात इंजीनियरिंग पूर्ण केले त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतला. याच इन्स्टिट्यूटने धनगर आरक्षण सर्वे देखील केलेला होता. ही संस्था दक्षिण आशियातील अव्वल क्रमांकाची संस्था मानली जाते. या संस्थेतूनच सौरभ उत्तीर्ण झाला. सौरभ फक्त 65 झाला नाही तर त्याने जगातील पंधराव्या नंबर वर असलेल्या विद्यापीठात त्याला पीएचडी करण्यासाठी ऑफर देखील आलेली आहे, असे देखील त्याने सर्वांसमोर सांगितले.

त्याचा हा प्रवास जरी वाचायला आपल्याला सोपा वाटत असला तरी प्रत्यक्ष जीवनामध्ये हा प्रवास अतिशय खडतर होता. सौरभने सांगितले की मला शिक्षण घेण्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाली. मी एक मेंढपाळाचा मुलगा वस्ती वाड्यावर राहत इंग्लंड पर्यंत जाऊ शकलो. हे सर्व शक्य झाले ते म्हणजे डॉक्टर आंबेडकरांच्या प्रेरणेमुळेच आज मला शिक्षणाचे महत्त्व पटलेले आहे परंतु आजही माझ्या समाज बांधवांमध्ये शैक्षणिक जागरूकता अजिबात नाही. ही जागरूकता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील.

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वजण जमले होते, अशावेळी अहिल्याबाईंच्या कार्याची देखील आठवण सौरभने सर्वांना करून दिली. अहिल्याबाई म्हणजे सर्व समाजाच्या नेत्या होत्या त्यांनी राज्य माळव्यात असताना देखील सर्व देशभर मंदिराच्या जीर्णोद्धाराची कामे केली, त्यानंतर भारतामध्ये राष्ट्र संकल्पना निर्माण झाली इतके असून देखील त्यांनी आपल्या राज्यकारभारातून साहित्य संस्कृती जपून ठेवली. त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा आजही आपण घेत आहोत व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करत आहोत असे देखील सौरभ म्हणाला.

जेव्हा सौरभ ला स्वतःची व्यक्तिगत जीवनाबद्दल विचारले तेव्हा सौरभ भावुक झाला कारण की त्याची परिस्थिती ही अत्यंत संघर्षाची होती. त्याचा जन्म रानामध्ये झाला होता. त्याचा जन्म झाला तेव्हा आजूबाजूला कोणतीही नर्स उपलब्ध नव्हती, अशावेळी त्याच्या आईला शेवटी ज्वारीच्या चिपाडया ने माझी नाळ कापावी लागली असे देखील तो म्हणाला.

स्वतःला सिद्ध करत असताना सौरभने स्वतःचे शिक्षण तर पूर्ण केले पण त्याचबरोबर एक सामाजिक जबाबदारी म्हणून देखील मेंढपाळ बांधवांच्या समस्यासाठी तीन वेळा मोठी मोठी आंदोलन केलेले आहे तसेच 19 डिसेंबरला दहा हजार मेंढपाळ घेऊन तो नागपूर येथे देखील आंदोलनासाठी उपस्थित होता. या आंदोलन दरम्यान त्याची मागणी फक्त इतकीच होती की आमच्या समाजातील बांधवांना देखील शिक्षण मिळावे. आमच्यासाठी देखील शिक्षणाचे द्वारे खुली व्हावीत. आजही अनेक जण वीज पडून मृत्यू होण्याच्या घटना या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आमच्या मेंढरांना चारण्यासाठी राखीव जंगल देखील नाही आणि म्हणूनच अशा वेळी या समाज बांधवांना पोटावर दगड ठेवून जगावे लागत आहे.

अश्याप्रकारे सौरभने आपल्या भाषणाद्वारे उपस्थित असलेल्या अनेकांचे मने जिंकली खरच सौरभ ने स्वतःचे वेगळेपण सिद्ध केलेले आहे. स्वतःचे शिक्षण करत असताना त्याने समाज बांधिलकी अजिबात सोडली नाही. आपण सामाजिक घटक आहोत, याचे भान राखुन आजही सौरभ आपल्या समाज बांधवांसाठी धावून जातो हे अत्यंत महत्त्वाचे आहे.