Life

व्यवसाय करण्याआधी नोकरी करा, जॉब शिस्त शिकवतो

नोकरी की व्यवसाय या गोंधळात माणूस अडकून पडलाय. त्याला स्पर्धात्मक आयुष्यात जास्तीत जास्त पैसा कमवण्याची गरज वाटू लागलीये. खरं तर त्यात काही चुकीचं कोणालाच वाटत नसावं. कारण आपली आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तणावमुक्त आयुष्य जगता येते. मोटिव्हेशनल स्पीच देणारी प्रत्येक व्यक्ती हेच सांगत असते. की हार मानू नका.

सतत काम करत रहा, नवनवीन आयडिया शोधा. म्हणजेच तुम्हाला पैसे त्याप्रमाणात अधिक मिळत जातील. पण नोकरी करून मिळालेल्या पैशातून गरजा भागवता येत नाहीत. अस काहींच म्हणणं असतं. तर व्यवसाय करूनही आम्हाला फायदा कमी आणि तोटाच होतोय असं काही जण सांगतात. खरंतर वेळेचे नियोजन, शिस्त आणि मन लावून काम केल्यास दोन्ही गोष्टीतून आर्थिक लाभ होतो. त्यावरूनच एका रिल मधून तरुणाने उत्तम विचार व्यक्त केले आहेत.

तो म्हणतो की, व्यवसाय हा करायला पाहिजे. मराठी माणसाने तर न घाबरता व्यवसायाच्या क्षेत्रात पाऊल टाकावे. पण तो करण्याअगोदर एकदा नोकरी करा. कारण नोकरी आपल्याला शिस्त, वेळेचे नियोजन सर्व काही शिकवते. म्हणजेच आपला जॉबचा टायमिंग सकाळी 8 असेल. तर आपल्याला 8 ला कामावर जाणे बंधनकारकच असते.

तसेच दिलेलं काम वेळेवर पूर्ण होयला पाहिजे. कंपनीने दिलेलं टार्गेटही आपण त्यामुळे पूर्ण करायला बघतो. कारण आपल्याला पगार कापला जाईल याची भीतीही असते. त्यामुळे व्यवसाय तर कराच पण त्याअगोदर एकदा जॉब करा असं हा तरुण सांगत आहे.

नोकरी करत असताना माणसाला कंपनीच्या नियमात राहून एक शिस्त लागते. आपण ती कधीही मोडण्याचा प्रयत्न करत नाही. शिस्त आणि वेळेचा फायदा आपल्याला नोकरी, व्यवसाय सोडून इतर गोष्टीतही होतो. नोकरी करताना लागलेली शिस्त आणि वेळेचे नियोजन आपल्याला व्यवसायात उपयोगी ठरते.

आपण 2 वर्षांहून अधिक काळ नोकरी केली. तर आपल्याला एक शिस्तबद्ध राहण्याची सवय होऊन जाते. आणि पुढे व्यवसाय सुरू केल्यावर त्यामध्ये या शिस्तीचा नकळत फायदा होतो. म्हणजेच उगाच नोकरी सोडून जॉब करायला आलो. आपली नोकरीच बरी होती. असे विचारही दूरदूर पर्यंत मनात येत नाहीत. यामुळे व्यवसाय कराच पण त्याअगोदर नोकरी करा.

नोकरी करून अनेक जण समाधानी

काहींना नोकरी करताना अडचणी जरी आल्या तरी ते त्यावर मात करून पुढे जातात. कुठलाही तणाव न घेता ते स्वतःला आलेले प्रॉब्लेम सोडवतात. अशा लोकांना नोकरीतून समाधान मिळते. आणि ते अधिक चांगल काम करत असल्याने त्यांचे प्रमोशनही होत जाते. सांगायचं तात्पर्य एवढंच की नोकरी आणि व्यवसाय दोन्ही उत्तमच आहे. फक्त तुमची काम करण्याची पद्धत, शिस्त, वेळ या गोष्टींवर सर्वकाही अवलंबून आहे.