Spirituality

जो हाथ में है उस पर पुरा फोकस करो – गौर गोपाल दास

धकाधकीच्या जीवनात आपण नेहमीच नकारात्मक विचार करत असतो. एकमेकांशी तुलना करून स्वतःच्या आयुष्यात अडचणी निर्माण करू लागतो. पण जे मिळतंय त्यात आपण समाधानी आहोत का? ते अधिक मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत का? असा विचार मात्र कधीच करत नाही. त्यावरूनच गौर गोपाल दास यांनी सकारात्मक संदेश दिला आहे.

ते म्हणतात कि, तुमच्या हातात जे काही आहे त्यावर लक्ष द्या. त्यामध्ये अजून काय प्रगती करता येईल याचा विचार करा. पण ते सोडून तुम्हाला जे जमत नाही. त्यावर वेळ घालवू नका. त्यामुळे तुम्हाला कशातच यश मिळवता येणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर स्पर्धात्मक युगात प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करतोय. त्यासाठी तो एका कामावर फोकस करू शकत नाही. एकाच वेळी अनेक कामे करायला बघतोय.

बेसिक उदाहरण द्यायचं झालं तर आपण जेवताना जेवणचं केलं पाहिजे. त्या प्रक्रियेत टीव्ही बघ, मोबाईल हातात घे, यामुळे आरोग्याला हानी पोहचू शकते. यावरून पण दास यांनी उदाहरण दिल होत कि, जेवताना जेवण करा, टीव्ही बघताना टीव्ही बघा, मोबाईल घेऊन बसलाय मग मोबाइलवरच लक्ष द्या.

एकाच वेळी एक काम पूर्ण केले. तर ते व्यवस्थितच होते. त्यामध्ये कुठल्याही अडचणी राहत नाहीत. हीच गोष्ट आपले आयुष्य, करिअर, जीवनशैलीला लागू होते. नोकरीत आपण आपल्याच कामावर लक्ष केंद्रित केल्यावर ते उत्तम होणार का नाही? याच उत्तर दास यांच्या मते १०० टक्के होत असणार.

काम उत्तम अन् पूर्ण होण्याबरोबरच मनाला समाधान मिळेल हे मात्र नक्कीच. त्याच कामात अधिक आवडही निर्माण होईल. मग यशाचे शिखर गाठण्यास तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. राहिली गोष्ट तुलना करण्याची. पण जर तुम्ही एकाच कामात उत्तमरीत्या सक्सेस मिळवलं. तर तुलना करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि तुम्हाला पैसाही त्याच प्रमाण वाढवला जातो. आयुष्य आहे म्हणजे अडचणी येणारच.

पण त्यांना आपण कसे सामोरे जातो हे सद्यस्थितीत महत्वाचे. मोटिव्हेशनल स्पीच देणारे दास तेच सांगतात कि, तणाव घेऊ नका. स्पर्धा आहे तर हारजीत होणारच. फक्त टिकून राहण्याचा प्रयत्न करा. यश तुमच्यापासून जास्त दूर नाही.