Life

वाईट काळात काळजी करू नका, चांगला काळ नक्कीच येईल

आपल्यावर वाईट वेळ कधी येईल हे सांगता येत नाही. ती कामात असो वा वैयक्तिक जीवनाच्या असो. पण त्यावर मात मिळवणे कठीण असते का? वाईट वेळ आपल्याला स्वतःहून घालवता येत नसेल. तर त्यावर मार्ग मात्र नक्की काढता येतो.

“मला आता जॉब मिळत नाहीये. सध्या खूपच वाईट दिवस सुरू आहेत. कुठंही मुलखातीला गेलो तरी रिजेक्ट केलं जातंय. आता काय करायचं.”

असे अनेक अनुभव तरुणांना येत असतात. त्यामुळे ते खचूनही जातात. पण वाईट दिवस हे अधिक काळ टिकत नाहीत. हे आपण स्वतःहूनच मान्य करायला हवे. मग प्रयत्न करण्याशिवाय पर्याय नाही. आणि प्रयत्नाला 100 टक्के यश मिळतच असते. वैयक्तिक जीवनातील प्रेम, लग्न, घरातील अडचणी यावरूनही आपल्याला वाईट दिवस आल्यासारखे वाटते. पण त्यावरही उपाय करता येतोच. घरातील अडचणी या घरातल्या लोकांना विश्वासात घेऊनच सोडवता येतात.

तिकडं स्वार्थ साधून मार्ग मिळत नसतो. आपण मात्र कुटुंबातील अडचणी सोडवण्यासाठी भांडणाचा पर्याय निवडतो. एकमेकांना समजून घेण्यापेक्षा माझंच खरं हे दाखवण्यासाठी प्रयत्न करतो. पण त्याने काही साध्य होणार आहे का? प्रश्नाचं उत्तर आपल्याकडेच असतं. पण ते कधी शोधण्याचा प्रयत्न करत नाही. आणि एकच गोष्ट आपण लक्षात ठेवतो की, सध्या माझे वाईट दिवस चाललेत. अरे पण त्यावर उपाय होऊ शकतो असा विचार करत नाही.

अशा वाईट दिवसांवरून एका रिल मधून व्यावसायिक पॉझिटिव्ह संदेश देतोय. तो म्हणतो की, वाईट वेळ ही चांगली वेळ आणण्यासाठी दिली जाते. वाईट वेळ आल्यावर रडत बसू नये. तर त्यावर काम करत राहावे, चांगली वेळ आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावेत. आयुष्य दोन गोष्टींवर चालत असते. त्या म्हणजे चांगली वेळ आणि वाईट वेळ. म्हणून वाईट वेळ आल्यावर घाबरून जाऊ नका. कारण चांगली वेळ येणारच आहे, आज नाही तर उद्या नक्की येणार हे लक्षात ठेवनूच कामाला लागा.

अनेक जण वाईट दिवसांत टोकाची पाऊल उचलतात. त्यामुळे काय चांगले दिवस खरंच येतात का? तर अजिबातच नाही. उलट जो माणूस हे टोकाचं पाऊल उचलतो. म्हणजे स्वतःबरोबर इतरांनाही शिक्षा देऊन जातो. आणि त्यांच्यावर वाईट दिवस सुरू होतात. असे निर्णय घेण्यापेक्षा आपण सकरात्मक विचाराने चांगले दिवस आणि वेळही मिळवू शकतो. काहीच सुचत नसेल तर आपल्या जवळच्या निकटवर्तीयांचे मार्गदर्शन लाभदायी नक्कीच ठरते.

अशा वेळी आपल्याला सांगणारा उगाच काहीही सल्ले देतोय का? त्याला स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे का? असे नकारात्मक विचार आपण करणे योग्य नसते. त्यांचा किमान सल्ला घ्यावा तो आत्मसात करायचा की नाही. हे ठरवणं आपल्यावरच असते. त्यामुळे वाईट दिवसात नकारात्मक विचार करण्यापेक्षा फक्त चांगले काम करण्याचा प्रयत्न करा.